भीमरूपी महारुद्र स्तोत्र | Bhimroopi Maharudra Stotra
भीमरुपी महारूद्र स्तोत्र
भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती।
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना
॥१॥
महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें।
सौख्यकारी दुःखहारी, दूत वैष्णव गायका
॥२॥
दीननाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा।
पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ॥३॥
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना।
पुण्यवंता पुण्यशीळा, पावना
परितोषका ॥४॥
ध्वजांगे उचली, बाहो, आवेशें लोटला पुढें।
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां
कांपती भयें ॥५॥
ब्रह्मांडे माईली नेणों, आंवळे दंतपंगती।
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा,
भ्रुकुटी ताठिल्या बळें ॥६॥
पुच्छ ते मुरडीले माथा, किरीटी कुंडले बरीं।
सुवर्ण कटी कांसोटी, घंटा
किंकिणी नागरा ॥७॥
ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू।
चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी
॥८॥
कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे।
मंद्राद्रीसारिखा द्रोणू,
क्रोधें उत्पाटिला बळें ॥९॥
आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती।
मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा
नसे ॥१०॥
अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे।
तयासी तुळणा कोठे, मेरु मंदार धाकुटे
॥११॥
ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छें करू शकें।
तयासी तुळणा कैंची,
ब्रह्मांडी पाहता नसे ॥१२॥
आरक्त देखिलें डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा।
वाढतां वाढतां वाढें, भेदिले
शून्यमंडळा ॥१३॥
धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही।
पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें
करूनियां ॥१४॥
भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही।
नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें
॥१५॥
हे धरा पंधरा श्र्लोकी, लाभली शोभली बरी।
दृढदेहो निसंदेहो, संख्या
चन्द्रकळा गुणें ॥१६॥
रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू।
रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष
नासती ॥१७॥
॥ इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ॥
Bhimroopi Maharudra Stotra Image
![]() |
Bhimroopi Maharudra Stotra |
Bhimrupi Maharudra Stotra Hanuman Stotra Bajrangbali Stotra Hanuman Mantra Bhimroopi Maharudra Stotra Lyrics Hanuman Stotra PDF